चौदा रत्ने
चौदा रत्ने
हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृतमिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या.
- लक्ष्मी- विष्णुपत्नी
- कौस्तुभ मणी- श्रीविष्णुने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच कोहिनूर होय.
- कल्पवृक्ष पारिजात वृक्ष (कल्पद्रुम) प्राजक्ताचेझाड.[१]इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष).
- सुरा वारुणी- दैत्यांचे मादक पेय[२] ,दारू, मद्य [३]
- धन्वंतरी (देवांचे वैद्यराज)
- चंद्रदेव(चंद्रमा)[४] शिवाने मस्तकात धारण केले.
- कामधेनू-इच्छापूर्ती करणारी गाय.
- ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती.
- रंभा- मेनका, इत्यादी अप्सरागण.
- उच्चै:श्रवा- सात तोंडे असलेला घोडा.सुर्यदेवाचे वाहन.[५]
- हलाहल विष- कालकूट विष[६]वा शिवाने प्राशन केले .
- हरिधनु वा शारंग धनुष्य - भगवान विष्णूचा धनुष्य आहे.
- शंख - श्रीविष्णूचा पांचजन्य शंख आहे.
- अमृत-देवांचे पेय.
श्लोक
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः ।
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।
रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलम् ॥[७][८]
रामायण आणि महाभारत पुराणानुसार इतर रत्नसंपादन करा
पुराण पासून पुराण पर्यंत भिन्न आहे आणि रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधेही किंचित वेगळी आहे.[९][१०]
- कल्पवृक्ष ,
- पांचजन्य शंख ,
- ज्येष्ठा देवी(अलक्ष्मी) (१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].
हे पण पहासंपादन करा
संदर्भ यादीसंपादन करा
- ^ "समुद्र मंथन". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "समुद्र मंथन". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "कालकूट". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2015-08-22.
- ^ "कौस्तुभ". विकिपीडिया. 2015-06-07.
- ^ "पान:छन्दोरचना.djvu/35 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ Astrologer. "Samudra Manthan-churning of the ocean and its gifts- milky way". AstroPeep.com (इंग्रजी भाषेत).2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Samudra manthan". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-27.
Comments
Post a Comment