गाईचा महिमा ( पुराण कथा संग्रह -१)
गाईचा महिमा हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. गाईचा महिमा भागीरथी नदीच्या तीरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतंभर नावाचा राजा होता. संतानप्राप्तीसाठी जाबाली ऋषींनी त्याला गाईची पूजा करण्यास सांगितले. गाईचे तोंड, शेपूट, शिंगे, पाठ या सर्वांत देवाचे अस्तित्व असून जो गाईचे पूजन करतो, त्याचे मनोरथ पूर्ण होतात. या संदर्भात जाबाली मुनींनी राजा जनकाची एक कथा सांगितली. एकदा योगसामर्थ्याने राजा जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला. दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला. त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे सेवक घेऊन गेले. राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळून चालले होते. त्या वेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते. जनकाच्या शरीरास स्पर्शून येणार्या हवेमुळे त्यांना छान वाटले. पण राजा तिथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्यांच्या यातना सुरू होऊन ते ओरडू लागले. जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करू लागले. त्या दुःखी जिवाच्या करुण हाकांनी जनकाचे मन हेलावले. आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव सुखी होत असतील, तर आपण येथेच राहावे. हाच आपला स्वर्ग असे वाटून ज...
Comments
Post a Comment