Posts

Showing posts from July, 2020

चातुर्मास पौराणिक कथा, ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो

मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?' ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणार्‍या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले. 

का असतो बाप्पा दीड दिवसांचा? जाणून घ्या पुराणातील कथा

गणेश चतुर्थी ला गणपतीचं थाटात आगमन झालं अन् बाप्पा दीड दिवसानंतर वाजत गाजत घरीही निघाला आहे. अनेक भाविक दीड दिवसांच्या गणपतीची आपल्या घरी स्थापना करतात. कारण सर्वांनाच ११ दिवस गणपतीची स्थापना करणं शक्य नसतं. पण त्यामागची मूळ संकल्पना वेगळीच आहे. मूळ संकल्पनेनुसार आपण आपल्या हातानं मातीपासून गणपतीची मूर्ती बनवायला हवी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायला हवी आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमन म्हणून विसर्जन करायला हवं. पण आपल्याकडे कालांतरानं यात बदल होत गेले. कुणी दीड दिवस, पाच दिवस तर कुणी  १० दिवस गणपतीची स्थापना  करू लागलं. पण आज आम्ही तुम्हाला दीड दिवसाच्या गणपती ठेवण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे सांगणार आहोत. श्री व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी श्रीगणेश त्यांचा लेखनिक होता. त्यामुळे लिहण्याच्या श्रमानं गणेशाच्या अंगातलं पाणी कमी झालं. त्वचा कोरडी पडली आणि गणरायाच्या अंगाला प्रचंड दाह व्हायला लागला. महर्षी व्यासांनी यावर उपाय म्हणून ताबडतोब शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला. त्यानंतर गणेशाच्या अंगावर थंड पाण्याचा शिडकावा केला.  याचा परिणाम म्हणजे गणेशाचा ...

कहाणी मंगळागौरीची

कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आण. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाहीं, म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस, निळीं वस्त्रं परिधान कर, रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत, आंत देवीची मूर्त आहे. मनोभावं पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घर-दारं आहेत, गुरं-ढोरं आहेत, धन-द्रव्य आहे, पोटी पुत्र नाहीं म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाल...

कहाणी आदित्यराणूबाईची

कहाणी आदित्यराणूबाईची ऐका आदित्यराणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा आणावयास रानांत जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसतां ! तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाहीं, मातत नाहीं घेतला वसा टाकीत नाहीं. तेव्हां त्या म्हणाल्या श्रावणमास येईल. पहिल्या आदितवारीं मौनानं (मुकाट्यानं) उठावं. सचीळ वस्त्रासहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या (नागवेलीच्या) पानांवर रक्त चंदनाची आदित्यराणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तांतु करावा, त्यास सहा गांठी द्याव्या, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप गूळ -खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. सह मास चाळई, सहा मास चाळावी. माधीं रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं ? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर. लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोडगळसरू द्यावी, नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन कर...

कहाणी धरित्रीची

कहाणी धरित्रीची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी धरित्रीची ऐका परमेश्‍वरा धरित्रीमाये, तुझी कहाणी. आटपाट नगर होतं, नगरांत एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी ? धरित्रीमायेचं चिंतन करी. वंदन करी. धरित्रीमाये, तूंच थोर, तूंच समर्थ. काकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे पांच पुत्र दे, दोघी कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे. हा वसा कधीं घ्यावा ? आखाड्या दशमीस घ्यावा, कर्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतियेला घ्यावा, माघी तृतियेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईंचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं ? वाढाघरची सून जेवूं सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ही धरित्रीमायेची साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संप्रूण (संपूर्ण).

कहाणी दिव्याच्या अंवसेची

कहाणी दिव्याच्या अंवसेची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी दिव्याच्या अंवसेची ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं ...

कहाणी गणपतीची

कहाणी गणपतीची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळें, विनायकाचीं देवळें, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा ? श्रावण्या चौथीं घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पसापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबीं भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं घ्याईजे; मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

कहाणी शिळासप्तमीची

कहाणी शिळासप्तमीची आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना, जळदेवतेची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या. राजा राजा, सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हें राजानं ऐकलं. घरीं आला मनीं विचार केला, फार दुःखी झाला. तुझ्या पुष्कळ लोकांच्या जिवापेक्षां नातवाचा जीव अधिक नाहीं, पण ही गोष्ट घडते कशी ? सून कबूल होईल कशी ? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरीं पाठवावी, मुलगा ठेवून घ्यावा. सासर्‍यानं आज्ञा केली, सून माहेरीं गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊं माखूं घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यांत नेऊन ठेविला. जळदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊं लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनीं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली तो वसा काय ? तळ्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीं पान घ्यावं, दहीभात आणि लोणचं वर घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकुळं तळ्या...

कहाणी वर्णसठीची

कहाणी वर्णसठीची आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला सात मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या, तसं त्यांना एके दिवशीं त्या ब्राह्मणानं विचारलं. मुली मुली, तुम्ही कोणाच्या नशिबाच्या ? त्याला साही मुलींनी उत्तर केलं, बाबा, बाबा, आम्हा तुमच्या नशिबाच्या ? सातवी मुलगी होती ती त्याला म्हणाली, मी माझ्या नशिबाची. हें ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं ? साही मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिलीं व थाटामाटानं त्यांची लग्नं केलीं. सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधि उठली होती, हातपाय झडून चालले होते, आज मरेल उद्यां मरील ह्याचा भरवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली, मुलीची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहूं लागली. पुढं थोड्याच दिवसांनीं तो तिचा नवरा मेला. तसं त्याला स्मशानात नेलं. पाठीमागून तीहि गेली. सर्व लोक त्याला दहन करूं लागले. तिनं त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, आतां तुम्ही जा, जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं. सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं. आतां इथं बसून काय होणार ? पण तिनं कांह...

कहाणी सोमवारची

कहाणी सोमवारची कहाणी सोमवारची (शिवामुठीची) आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं, रहावयास गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ती रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, 'बाई, बाई कुठं जाता ? महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहातों, त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलंबाळं होतात, नावडतीं माणसं आवडतीं होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनीं हिला विचारलं, तूं कोणाची कोण ? मी राजाची सून, तुमचेबरोबर येतें ! त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या, देवकन्या वसा वसूं लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसा वसता ? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं ? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं. दोन बेलाची पानं घ्यावीं. मनोभावें पूजा करावी. हातीं तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वराद...

कहाणी बोडणाची

कहाणी बोडणाची आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला दोन सुना होत्या; एक आवडती होती व दुसरी नावडती होती. आवडतीला घरांत ठेवीत. चांगलं चांगलं खायला-प्यायला देत, चांगलं ल्यायला नेसायला देत, तसं नावडतीला कांहीं करीत नसत. तिला गोठ्यात ठेवीत, फाटकं-तुटकं नेसायला देत, उष्टं माष्ट खायला देत, असे नावडतीचे हाल होत असत. एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला, तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावणं केलं. पुढं तिनं देवीची पूजा केली. सगळ्याजणींनी मिळून बोडण भरलं, कहाणी केली. पुढं देवीला नैवेद्य दाखविला. नंतर सर्व माणसं जेवलीं. नावडतीला उष्टंमाष्टं वाढून दिलं. तेव्हा तिला समजलं की घरांत आज बोडण भरलं. नावडतीला रडूं आलं कीं, मला कोणी बोडण भरायला बोलावलं नाहीं. सर्व दिवस तिनं उपास केला. रात्रीं देवाची प्रार्थना केली, नंतर ती झोपी गेली. रात्रीं नावडतीला स्वप्न पडलं. एक सवाशीण स्वप्नांत आली, तिला पाहून नावडती रडूं लागली. ती नावडतीला म्हणाली, मुली, मुली, रडूं नको, घाबरूं नको. पटकन् उगी रहा कशी. रडण्याचं कारण सांग ! नावडती म्हणाली, घरांत आज बोडण भरलं, मला कांहीं बोलावलं नाहीं, म...

कहाणी बुध-बृहस्पतीची

कहाणी बुध-बृहस्पतीची ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणें भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं, ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, आम्ही संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे, आतां आम्हीं पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा ! ते म्हणाले, श्रावणमासीं दर बुधवारी आणि बृहस्पतवारीं जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावं पूजा करावी, अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात ! त्याप्रमाणं ती कर...

कहाणी ज्येष्ठागौरीची

कहाणी ज्येष्ठागौरीची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी ज्येष्ठागौरीची आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशीं काय झालं ? भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्तीं बायका दृष्टीस पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरीं आलीं. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण ! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्ही बापाजवळ जा, बाजारांतले सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन ! मुलं तिथून उठलीं, बापाकडे आलीं. बाबा बाबा, बाजारांत जा, घावनघाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील ! बापानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला. सोन्यासारखीं मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवतां येत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जाव तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धांवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय...

कहाणी ललितापंचमीची

कहाणी ललितापंचमीची आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण होता. त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणींच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदानीं त्यांचं काय होतं नव्हतं तें सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जातां जातां एका नगरांत आलीं. दोन प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालतां चालतां दोघं दमून गेले आहेत, दोघांचे जीव भुकेनं कळवळले आहेत. दोघांचीं तोंडं सुकून गेलीं आहेत, असे ते दोघेजण त्या नगरींत आले. इतक्यांत एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरितां घरांतून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवूं घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनीं आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरीं ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवूं लागला. मुलंहि तिथं राहून वेद पढूं लागलीं. असं करतां करतां पुष्कळ दिवस झाले. पुढं काय झालं ? तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करूं लागला. शिष्यांनीं गुरुजींना विचारलं, हें आपण काय करतां ? तेव्हां गुरुजी म्हणाले, हें उपांगललितापंचमीचं व्रत आहे. ह्यांत द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतु प्...

कहाणी महालक्ष्मीची

कहाणी महालक्ष्मीची आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता. त्याचं नांव नंदनबनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणीं बुडे, क्षणी अंतराळीं जाई, क्षणीं पाताळीं जाई, असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा वाळत चालला. एके दिवशीं राजानं सर्व लोक बोलावले. नंदनबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनीं राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरांत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणूं लागला, आई आई, मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातों. म्हातारी म्हणाली, बाबा, तूं गरिबाचा पोर, चार पावलं पुढं जा. झाडाआड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हंसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली.म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. सर्व लोक घरीं आलें. त्यांना नंदनबनेश्वर कांहीं सांपडला नाहीं. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झालीं. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पु...

कहाणी पिठोरीची

कहाणी पिठोरीची आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अंवसेच्या दिवशीं बापांचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशीं श्राद्ध त्या दिवशीं सकाळपासून त्याच्या सुनेचें पोट दुखूं लागें व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं. म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीहि तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. तें मेललं पोर तिच्या ओटींत घातलं. तिला रानांत हांकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तूं कोणाची कोण ? इथं येण्याचं कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाहीं तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील ! तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करतांच मी इथं आल्यें आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अंवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसासर्‍याचं श्राद्ध अ...

कहाणी ऋषिपंचमीची

कहाणी ऋषिपंचमीची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी ऋषिपंचमीची ऐका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशीं काय झालं ? त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरांत कालविला. त्या दोषानं काय झालं ? तिचा नवरा पुढच्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी ! दोघंहि आपल्या मुलांच्या घरीं होतीं. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशीं त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं. आज माझ्या आईचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा सैंपाक कर ! ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या केल्या. चार कोशिंबीरी केल्या, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झाला ? खिरीचं भांडं उघडं होतं त्यांत सर्पान आपलं गरळ टाकलं. हें त्या कुत्रीनं पाहिलं, मनांत विचार केला. ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन् खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं...

कहाणी शनिवारची

कहाणी शनिवारची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी शनिवारची (मारुतीची) आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरांत बसून सैंपाक करून ठेवीत असे. सासूसासर्‍यांना वाढीत असे, उरलंसुरलं आपण खात असे. असं होतां होतां श्रावणमास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारीं आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखूं घाल. बाबा, घरामध्यें तेल नाहीं. तुला न्हाऊं कशानं घालूं ? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊं घाल. घागरींत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊं घालून जेवू घातलं, उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळीं घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला.  इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झालीं. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासीबटकींनी घर भरलं ! सासूसासरे देवाहून आलीं, तों घर कांहीं ओळखेना. हा वाडा कोणाचा ? सून दारांत आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई, इकडे य...

कहाणी सोमवतीची

कहाणी सोमवतीची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी सोमवतीची आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला सात मुलगे व एक मुलगी होती. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नांव धनवती नि मुलीच नांव गुणवती होतं. त्यांच्या घरी अशी चाल होती की, आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनीं त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झाल ? एक मोठा सूर्यासारखा ब्राह्मण आला. सगळ्यांनीं त्याची पूजा केली. साती सुनांनीं त्याला भिक्षा घातलीं. नमस्कार केला. बाह्मणानी त्यांना आशीर्वाद दिला. संपत वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी असो ! धनवतीबाईनें आपल्या मुलीला सांगितलं, मुली, मुली भीक्षा घाल ! मुलगी उठली, भिक्षा घातली नि नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला. धर्मिणि हो ! मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई आई, भटजींनीं जसा आपल्या वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहूं, त्याला पुन्हा भिक्षा घाल ! मुलीनं पुन्हा भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मण म्हणाला, धर्मिणी हो ! तेव्हां धनवतीनं त्याला विचारलं, हिला असा आशीर्वाद का ...

कहाणी वसुबारसेची

कहाणी वसुबारसेची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी वसुबारसेची आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होतीं. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळीं, मुगाळीं वासरं होतीं. एके दिवशीं काय झालं ? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हातारी सकाळीं उठली, शेतावर जाऊं लागली. सुनेला हांक मारली, मुली मुली इकडे ये ! सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जातें. दुपारीं येईन. तूं माडीवर जा, गव्हाचे,मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली. गहूं मूग काढून ठेवले. खालीं आली, गोठ्यांत गेली. गव्हाळीं मुगाळीं वसरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलीं, चिरलीं व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसलीं. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणुन सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजतां चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशीं जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुने...

सौभरी चरित्र ( पुराण कथा संग्रह -३)

सौभरी चरित्र सौभरी नावाचे ऋषी जलात राहून तपस्या करीत होते. त्याच जलात अनेक मासे होते. सौभरी ऋषींचे नकळत या मत्स्यपरिवाराकडे लक्ष वेधले गेले. त्यांच्या रमणीय क्रीडा पाहून त्यांना वाटले, "एवढ्या कनिष्ठ योनीत जन्माला येऊनही हे सगळे आनंदात आहेत. म्हणजे गृहस्थाश्रमात जास्त सुख दिसते." अशा प्रकारे आपणही गृहस्थ धर्म स्वीकारावा म्हणून तो राजा मांधाताकडे गेला व त्याच्या अनेक कन्यांपैकी एकीशी लग्न करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. त्याचे ते वार्धक्‍याकडे झुकल्यासारखे शरीर पाहून मांधाता म्हणाला, "कन्या ज्याला पसंत करेल त्यालाच ती देण्याची आमची रीत आहे. तरी तू माझ्या मुलींना भेट." अंतःपुरात प्रवेशताना सौभरींनी योगबलाने आपले शरीर तरुण व रूपसुंदर बनवले. सर्वच कन्यांनी त्यांना पसंत केल्यामुळे राजाने सर्व कन्या त्याला विवाह करून अर्पण केल्या. सौभरी ऋषीने सर्व पत्नींसाठी वेगळा महाल बनवला व मोठ्या आनंदाने गृहस्थाश्रम चालू केला. एके दिवशी राजा मांधाता मुलींना भेटायला गेला. तेथील सर्व ऐश्‍वर्य पाहून त्याने एका मुलीला, "सर्व काही कुशल आहे ना? महर्षी सौरभ तुझ्यावर प्रेम करतात ना?...

जयध्वजाचे आख्यान ( पुराण कथा संग्रह -३)

जयध्वजाचे आख्यान हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. जयध्वजाचे आख्यान सहस्रार्जुनाच्या शंभर पुत्रांपैकी शूर, शूरसेन, कृष्ण, धृष्ण व जयध्वज हे विशेष शूर व धार्मिक प्रवृत्तीचे होते. जयध्वज हा विष्णूंचा तर इतर चौघे रुद्राचे भक्त होते. जयध्वज विष्णूंची आराधना करीत असता ते चौघे म्हणाले, "आपले वाडवडील शंकरभक्त होते. तरी तूही तसेच कर." यावर जयध्वज म्हणाला, "पृथ्वीवरचे सर्व राजे भगवान विष्णूंचा अंश आहेत. विष्णूच जगाचे पालन करतात. म्हणून राज्यकर्त्यांनी विष्णूचीच पूजा केली पाहिजे." अशा प्रकारे वादविवाद वाढत गेला. तेव्हा ते सर्व जण सप्तर्षींच्या आश्रमात गेले व त्यांनी त्यांचे म्हणणे विचारले. तेव्हा वसिष्ठ व इतर मुनी म्हणाले, "ज्याला जी देवता मान्य होते तीच त्याची इष्ट देवता होय; पण काही विशेष कार्यासाठी इतर देवांनाही भजतात. राजांसाठी विष्णू हाच देव होय. विद्येची देवता सरस्वती, तर राक्षसांचा आराध्य देव शंकर व किन्नरांची देवता पार्वती आहे." हे ऐकून जयध्वजाने विष्णूची आराधना करणे योग्य असे ठरले. तो आपल्या सुंदरपूर नगरीस येऊन...

सहस्रार्जुनाची कथा ( पुराण कथा संग्रह -३)

सहस्रार्जुनाची कथा हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. सहस्रार्जुनाची कथा महिकावती नावाच्या नगरीत कृतवीर्य नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव रंकावती असे होते. मधू नावाच्या शापित राक्षसाने तिच्या पोटी सहस्रार्जुन नावाने जन्म घेतला. या मधू राक्षसाने शंकराला पूजेच्या वेळी त्रास दिला होता. तसेच पार्वतीच्या एक हजार पूजा त्याने मोडल्या होत्या. म्हणून शंकरांनी त्याला, तू पुढील जन्मी हातावाचून जन्म घेशील व दुःख भोगशील असा शाप दिला होता. त्यामुळे सहस्रार्जुन जन्मला तेव्हा त्याला हात नव्हते. मग त्याने दत्तात्रेयाची प्रखर उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतले व 'मला सर्व शरीरावर हात दे' असा वर मागितला. तेव्हा दत्तात्रेयांनी त्याला 'सहस्र हात तुला उत्पन्न होतील' असा वर दिला. नंतर सहस्रार्जुनाने शंकरांची तपश्‍चर्या करून त्यांच्याकडून अमृत मिळवले व तो महिकावतीस राज्य करू लागला.  एकदा लंकाधिपती रावण दिग्विजय मिळवून परत जात असता पूजेची वेळ झाली म्हणून वाटेत नर्मदाकाठी थांबला. स्नान करून तो तेथे शिवपूजा करीत होता, त्याच वेळी ...

रेणुका स्वयंवर ( पुराण कथा संग्रह -३)

रेणुका स्वयंवर हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. रेणुका स्वयंवर भागीरथीच्या तीरी कान्यकुब्जनगरीत रेणू राजाच्या यज्ञातून रेणुकेने प्रवेश केला. ही रेणुका म्हणजे अदिती व पार्वती यांचे एकत्र रूप होय.  भृगुऋषींचा मुलगा च्यवन याचा मुलगा ऋचिक ऋषी गोदावरीच्या काठी राहत होता. त्याने सोमवंशी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. पुढे सत्यवतीच्या पोटी शंकर व कश्‍यप एकरूप होऊन जन्माला आले. ऋचिक ऋषीने त्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवले. एकदा ऋचिक ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषी आले व त्यांनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे ते सर्व जण जमदग्नीला घेऊन यात्रेला निघाले. कान्यकुब्जनगरीचा राजा रेणू याने आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावर ते ऋषी समारंभ पाहण्यासाठी मंडपात गेले. अनेक देशांचे राजे, राजपुत्र रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. रेणुकेने त्या सर्वांसमोरूनच जाऊन केवळ समारंभ पाहण्यासाठी आलेल्या जगदग्नीच्या गळ्यात माळ घातली. हे पाहून सर्व राजांना संताप आला व त्यांनी रेणुकेला पळवून नेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी सैन्य एकत्र...

रेणुकेचा जन्म ( पुराण कथा संग्रह -३)

रेणुकेचा जन्म हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. रेणुकेचा जन्म ईक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून तो कारभार पाहात असे. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी व नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. मग राजाने अत्री, वसिष्ठ इ. ऋषींना बोलावून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांगसुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचे नाव रेणुका असे ठेवले. ही रेणुका म्हणजे पार्वती व कश्‍यप पत्नी अदिती या दोघींचा अवतार होय. याची कथा अशी - एकदा दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूला पूर्वी त्यांनी हिरण्याक्षाचे वेळी घेतलेला वराहावतार, हिरण्यकश्‍यपूच्या वेळचा नृसिंहावतार व बळीच्या वेळचा वामनावतार यांची आठवण करून देऊन पुन्हा अवतार घेण्यासाठी विनंती केली.  प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, "या वेळी अदितीचे उदरी मी पूर्णरूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा तिने ते तेज सहन करण्याची तयारी करावी." हा नि...

समुद्रमंथन व राहूची कथा ( पुराण कथा संग्रह -३)

समुद्रमंथन व राहूची कथा हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. समुद्रमंथन व राहूची कथा जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना समुद्रमंथनाची कथा सांगण्याची विनंती केली. तेव्हा ते सांगू लागले- राजा, पूर्वी देव व दैत्य यांनी समुद्रमंथन करून अमृत व इतर रत्ने काढायचे ठरवले. त्यांनी मंदराचल पर्वताची रवी व वासुकी सर्पाचा दोर केला व मंथन सुरू केले. देव हे शेपटीच्या बाजूने व राक्षस मुखाच्या बाजूने ओढत होते. मुखातून बाहेर पडलेल्या विषाच्या उष्णतेचा सर्वांना त्रास होऊ लागला, तेव्हा महादेवांनी ते विष प्राशन केले. पुढे समुद्रमंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा (दारू), धन्वंतरी, चंद्र, रंभा, ऐरावत, अमृत, विष, उच्चैःश्रवा नावाचा घोडा, कामधेनू, शंख व हरिधनू अशी चौदा रत्ने निघाली. समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत खाली जाऊ लागला तेव्हा विष्णूंनी कूर्मरूप धारण करून तो वर उचलला.  वरील चौदा रत्नांची वाटणी होत असता अमृत व सुरा याबद्दल वाद सुरू झाला. या वादाचा निकाल करताना विष्णू म्हणाले, "देवांनी एका पंक्तीला व दैत्यांनी एका पंक्तीला बसावे. एक स्त्री येऊन अमृत व...