Posts

चौदा रत्ने

Image
चौदा रत्ने इतर भाषांत वाचा पहारा संपादन करा हिंदू धर्मातील  आख्यायिकेनुसार  देव - दानवांनी   अमृत मिळवण्यासाठी  समुद्रमंथन  केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या. लक्ष्मी - विष्णुपत्नी कौस्तुभ मणी- श्रीविष्णुने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच  कोहिनूर  होय. कल्पवृक्ष पारिजात वृक्ष (कल्पद्रुम)  प्राजक्ताचे झाड. [१] इंद्राला  प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष). सुरा वारुणी- दैत्यांचे मादक पेय [२]  ,दारू,  मद्य   [३] धन्वंतरी  (देवांचे वैद्यराज) चंद्रदेव (चंद्रमा) [४]  शिवाने मस्तकात धारण केले. कामधेनू -इच्छापूर्ती करणारी गाय. ऐरावत  -  इंद्राचे  वाहन असलेला  हत्ती . रंभा -  मेनका , इत्यादी अप्सरागण. उच्चै:श्रवा - सात तोंडे असलेला  घोडा .सुर्यदेवाचे वाहन. [५] हलाहल   विष - कालकूट  विष [६] वा शिवाने प्राशन केले . हरिधनु  वा  शारंग धनुष्य  - भगवान विष्णूचा धनुष्य आहे. शंख  - श्रीविष्णूचा  पांचजन्य ...

चातुर्मास पौराणिक कथा, ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो

मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?' ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणार्‍या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले. 

का असतो बाप्पा दीड दिवसांचा? जाणून घ्या पुराणातील कथा

गणेश चतुर्थी ला गणपतीचं थाटात आगमन झालं अन् बाप्पा दीड दिवसानंतर वाजत गाजत घरीही निघाला आहे. अनेक भाविक दीड दिवसांच्या गणपतीची आपल्या घरी स्थापना करतात. कारण सर्वांनाच ११ दिवस गणपतीची स्थापना करणं शक्य नसतं. पण त्यामागची मूळ संकल्पना वेगळीच आहे. मूळ संकल्पनेनुसार आपण आपल्या हातानं मातीपासून गणपतीची मूर्ती बनवायला हवी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायला हवी आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमन म्हणून विसर्जन करायला हवं. पण आपल्याकडे कालांतरानं यात बदल होत गेले. कुणी दीड दिवस, पाच दिवस तर कुणी  १० दिवस गणपतीची स्थापना  करू लागलं. पण आज आम्ही तुम्हाला दीड दिवसाच्या गणपती ठेवण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे सांगणार आहोत. श्री व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी श्रीगणेश त्यांचा लेखनिक होता. त्यामुळे लिहण्याच्या श्रमानं गणेशाच्या अंगातलं पाणी कमी झालं. त्वचा कोरडी पडली आणि गणरायाच्या अंगाला प्रचंड दाह व्हायला लागला. महर्षी व्यासांनी यावर उपाय म्हणून ताबडतोब शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला. त्यानंतर गणेशाच्या अंगावर थंड पाण्याचा शिडकावा केला.  याचा परिणाम म्हणजे गणेशाचा ...

कहाणी मंगळागौरीची

कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आण. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाहीं, म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस, निळीं वस्त्रं परिधान कर, रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत, आंत देवीची मूर्त आहे. मनोभावं पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घर-दारं आहेत, गुरं-ढोरं आहेत, धन-द्रव्य आहे, पोटी पुत्र नाहीं म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाल...

कहाणी आदित्यराणूबाईची

कहाणी आदित्यराणूबाईची ऐका आदित्यराणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा आणावयास रानांत जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसतां ! तो मला सांगा ! तुला रे वसा कशाला हवा ? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाहीं, मातत नाहीं घेतला वसा टाकीत नाहीं. तेव्हां त्या म्हणाल्या श्रावणमास येईल. पहिल्या आदितवारीं मौनानं (मुकाट्यानं) उठावं. सचीळ वस्त्रासहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या (नागवेलीच्या) पानांवर रक्त चंदनाची आदित्यराणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तांतु करावा, त्यास सहा गांठी द्याव्या, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप गूळ -खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा. सह मास चाळई, सहा मास चाळावी. माधीं रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं ? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर. लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी. नसेल तर जोडगळसरू द्यावी, नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन कर...

कहाणी धरित्रीची

कहाणी धरित्रीची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी धरित्रीची ऐका परमेश्‍वरा धरित्रीमाये, तुझी कहाणी. आटपाट नगर होतं, नगरांत एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी ? धरित्रीमायेचं चिंतन करी. वंदन करी. धरित्रीमाये, तूंच थोर, तूंच समर्थ. काकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे पांच पुत्र दे, दोघी कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे. हा वसा कधीं घ्यावा ? आखाड्या दशमीस घ्यावा, कर्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतियेला घ्यावा, माघी तृतियेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईंचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं ? वाढाघरची सून जेवूं सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ही धरित्रीमायेची साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संप्रूण (संपूर्ण).

कहाणी दिव्याच्या अंवसेची

कहाणी दिव्याच्या अंवसेची हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. कहाणी दिव्याच्या अंवसेची ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं ...