गरुड पुराणाबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
अठरा पुराणांपैकी एक पुराण “गरुड पुराण” आहे. गरुड हे भगवान विष्णूचे वाहन.
गरुड पुराणाचे दोन भाग आहेत..
एकात विष्णूची स्तुती आहे आणि दुसऱ्या भागात मृत्युनंतर पापी माणसाचे काय होते याचे वर्णन आहे.
पापी माणसं नरकात जातात..
यमलोकात जाताना अशा पापी माणसाला...
गरम वाळूवर चालावे लागते.. वाघ सिंह त्याचे लचके तोडतात, त्याला साप चावतात.. त्याच्यावर दगडांचा, रक्ताचा, शस्त्रांचा, गरम पाण्याचा, चिखलाचा वर्षाव होतो.
नंतर त्याला त्यांच्या पापांनुसार शिक्षा मिळतात.. त्याला आगीत टाकले जाते, उखळात घालून कांडले जाते, तेलात तळले जाते, जमिनीत अर्धे गाडले जाते. अशा भयंकर आणि अघोरी शिक्षा मिळतात..
त्याला अन्न पाणी मिळत नाही. मात्र त्याचे वंशज जेव्हा पिंडदान करतात तेव्हा ते अन्न त्याला मिळते.
असे गुरुड पुराणात म्हटले आहे.
हे वाचल्यावर काही प्रश्न निर्माण होतात.
नरक कुठे आहे?
हे वाघ, सिंह, साप, गरम पाणी वगैरे नरकाच्या वाटेवर कुठे असतात..
यमदूत कुणाला घेऊन जातात? आत्म्याला?
माणसाच्या मृत्युनंतर त्याचा आत्मा मुक्त होतो आणि त्याचे पार्थिव शरीर जाळले जाते.
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आत्म्याबाबत म्हणतात:-.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
(आत्म्याला) अग्नी जाळू शकत नाही, शस्त्राने मारता येत नाही. पाणी बुडवू शकत नाही की वारा शोषून घेऊ शकत नाही.
शिवाय आत्मा तर निर्गुण निराकार असतो. आत्मा परमात्म्याचा अंश असतो.. वगैरे..
आता गरुड पुराणात वर्णन केलेल्या शिक्षा कुणाला दिल्या जातात हा प्रश्न आहे. कारण आत्मा तर अमर आहे आणि शरीर तर जाळून टाकले आहे..
प्रत्येकाने याचा विचार करावा.
पुराणांची निर्मिती साधारण इसवी सन तिसऱ्या शतकात झाली असे मानले जाते.
त्यावेळेस इंडियन पिनल कोड सारखे कायदे नव्हते.. त्यामुळे माणसाने वाईट वागू नये. लोकांना त्रास देऊ नये म्हणून भीती घालण्यासाठी हे निर्माण केले असावे. कारण अदृश्य शक्तीची भीती जास्त असते. त्यामळे “पापं” करण्याची रिस्क कुणी घेत नाही.
आजच्या काळात हे irrelevant आहे .
Comments
Post a Comment